जि.प.प्रा.शाळा बिबथर ता.कळमनुरी जि.हिंगोली


शनिवार, ७ जानेवारी, २०१७

धन्यवाद मित्रांनो

 " शब्द शेवटचे...... "



         आर्थिक आयुष्याची सुरुवात या शाळेपासून झाली.अतिशय गरीब परिस्थीतीत शिक्षण पुर्ण केल्यामुळे ग्रामिण भागातील लेकरांसाठी काही तरी करावे अशी मनात इच्छा होती.सुरूवातीपासून ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत तसेच कामही केले.काही लोकांना आवडले,नाही आवडले तो भाग त्यांचा.


       आज दिसत आहे ते परिणाम दिसणे खुप सोपे आहे.पण तशी वातावरण निर्माण करण्यासाठी खुप मेहनत घ्यावी लागली.या कामात बिबथर गावातील आमचे सर्व मित्र, हितचिंतक,बापूमंडळी यांनी मोलाचे सहकार्य केले त्यांचे उपकार न विसरण्यासारखे आहे.सुंदर शाळा निर्माण करण्यासाठी सर्वांनी अहाेरात्र मेहनत घेतली.


       शाळेतील लहान मुलांमध्ये वेळ कसा निघून गेला मित्रांनो कळलेच नाही.बघता बघता साडेसात वर्षे निघून गेलीत.ही शाळा निर्माण करण्यासाठी या लहान मुलांनीही खुप मेहनत घेतली.या गोष्टीची जाणीव त्यांना ते मोठे झाल्यावर नक्कीच होईल.


               मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जोपर्यंत बिबथर या छोट्याशा गावात नोकरीला होतो तोपर्यंत कधीही घरची आठवण आली नाही.सगळं अगदी घरच्यासारखं होतं.ज्या लोकांनी घरच्यासारखं वागवलं त्यांचे उपकार मरेपर्यंत विसरणार नाही.



             मित्रांनो काम केल्याचे समाधान आजही आहे.केलेले कार्य कधीही वाया जात नाही.माननिय तहसिलदार व ईतरही वरिष्ठ अधिका-यांनी मनापासून कामाची प्रशंसा केली.जिल्हा पातळीपर्यंत आमच्या शाळेचे नाव झाले .त्या अनुषंगाने विविध प्रदर्शनामध्ये शाळेचे सादरीकरण केले. पुण्यापर्यंत जाऊन आलो.तेथील विविध गोष्टी आत्मसात केल्या ज्यांचा फायदा व्यावसायीक आयुष्यात मला पुढेही निश्चितचं होईल.



मित्रांनो माझ्या आयुष्यातील नोकरीचा पहिला टप्पा प्रा.शा.बिबथर केंद्र-कोंढूर ता.कळमनूरी जिल्हा हिंगोली येथे १६ जून २०१६ ला संपला.नोकरीच्या पुढच्या टप्प्यात मी प्रा.शा.दुर्गसावंगी केंद्र-पळसाेना ता.जि.हिंगोली येथे रूजू झालो आहे.येथेही अतिशय जिद्दीने आणि हसतखेळत अध्यापनाचे कार्य सुरू आहे.


                बिबथर गावात नोकरी करत असतांना  गावातील प्रत्येक नागरीकाने मला मोलाचे सहकार्य केले. त्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. केंद्रातील सर्व शिक्षकांनी अगदी भावासारख वागवलं त्यांंचेही मनापासून आभार श्रीमती धाबे मॅडम,श्री.आडे सर,यांनीही वेळोवेळी मदत केली त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार.पंचायत समितीतील सर्व अधिकारी कर्मचारी यांनीही वेळोवेळी मोलाची मदत केली त्याबद्दल त्यांंचेही मनापासून आभार.कळमनूरीतील माझ्या सर्व जिवलग मित्रांनो,कदाचित तुमचे सहकार्य नसते तर "मी कुठे असतो आणि मी हे सर्व कशा पद्धतीने सांभाळलं असतं?" ही कल्पना न केलेलीच बरी. मित्रांनो शेवटच्या श्वासापर्यंत तुमची आठवण विसरू शकणार नाही.

तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून आभार..


या ब्लॉगवरील शेवटचे शब्दांकन - श्री.अमोल देविदास खंगार