जि.प.प्रा.शाळा बिबथर ता.कळमनुरी जि.हिंगोली


विद्यार्थ्यांसाठी शासकीय योजना

*********************************************************************************************



१) शालेय पोषण आहार योजना :
                   शालेय उपस्थिती वाढविण्यासाठी या योजनेचा महाराष्ट्र शासनाला भरपूर फायदा झाला.आमच्या शाळेत ही योजना प्रभावीपणे राबविली जाते.शासनाने ठरविलेल्या निकषाप्रमाणे सोमवार ते शनिवार पोषण आहार दिला जातो.सोमवारी पोषक आहारामध्ये बिस्कीट दिल्या  जाते.पावसाळ्यात शाळेच्या परसबागेत भाजीपाल्याची लागवड केली जाते व हा ताजा भाजीपाला शालेय पोषण आहारात वापरला जातो.विद्यार्थी आनंदाने या योजनेचा लाभ घेतात.त्यातच आमचे समाधान आहे.

*********************************************************************************************





 २) मोफत शालेय गणवेश योजना  : 
             
           महाराष्ट्र शासनाची शालेय स्तरावर राबविली जाणारी दुसरी महत्वाकांक्षी योजना.वर्गातील सर्व मुली,मागासवर्गीय मुले व सर्वसाधारण प्रवर्गातील दारिद्र्यरेषेखालील मुले यांना मोफत गणवेशाचे वितरण सर्व शिक्षा अभियानांतर्गत करण्यात येते.दरवर्षी नवीन गणवेश घेणे शक्य नाही अशा पालकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी ही योजना प्रभावी आहे. 

*********************************************************************************************

 

 ३) मुलींसाठी उपस्थिती भत्ता :
                          
          मुलींची शाळेतील उपस्थिती टिकवणे व वाढविणे हे आजच्या काळातील खूप मोठे आव्हान आहे. मुलींसाठी उपस्थिती भत्ता देणे हे या योजनेचे स्वरूप आहे.SC,ST,VJNT,OBC या प्रवर्गातील मुलींना प्रत्येक उपस्थित दिवसासाठी १ रु. प्रमाणे उपस्थिती भत्ता देण्यात येतो.व मुली या योजनेचा भरीव लाभ घेतात.

*********************************************************************************************
 


 ४) आदिवासी मुलामुलींसाठी सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती :
                            
         महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात, डोंगरदऱ्यात विविध आदिवासी जमातीचे बांधव राहतात. या विविध जमातीतील मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांनी नियमित शाळेत यावे हा उदात्त हेतू पूर्ण करण्यासाठी हि शिष्यवृत्ती दिली जाते.ST संवर्गातील सर्व मुलामुलींना दरमहा ७५% पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास १०० रु. याप्रमाणे १० महिन्यासाठी शैक्षणिक वर्षाला १००० रु. शिष्यवृत्ती मिळते.या योजनेची आमच्या शाळेत प्रभावी अंमलबजावणी केली जाते.  

*********************************************************************************************         


 ५) मोफत पाठ्यपुस्तक वाटप योजना  : 
                    
                    इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व विषयाची पाठ्यपुस्तके आणि स्वाध्याय पुस्तिका महाराष्ट्र शासनामार्फत मोफत पुरविली जातात.सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिल्या जातो. 



*********************************************************************************************


             
                    अशाप्रकारे जि.प.प्रा.शाळा बिबथर येथे या विविध शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थांना दिला जातो.या सर्व शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यामागे अनेक हेतू आहे पण सर्वात महत्वाचे म्हणजे विद्यार्थी प्राथमिक शिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभागी झाला पाहिजे . त्याचा सर्वांगीण विकास होऊन एक सुजाण नागरिक घडवून राष्ट्राविकासाचा मजबूत पाया उभारणे हा आहे. ही राष्ट्राविकासाची फार मोठी जबाबदारी आपल्यावर आहे …









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा