काल दिनांक 23/02/2016 ला आमच्या पंचायत समिति कळमनूरीचे गटशिक्षणाधिकारी श्री नांदे सर आणि त्यांच्या सहकार्यांनी आमच्या शाळेला भेट दिली . प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी पाहून सर्वांनी समाधान व्यक्त केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात .
शाळा भेटीच्या वेळी डावीकडून श्री रूईकर सर ,श्रीमती धाबे मॅडम केद्रप्रमुख कोंढुर , सरांचे मित्र, गटशिक्षणाधिकारी श्री नांदे सर ,मुख्याध्यापक श्री खंगार सर ,सहायक शिक्षक श्री देशमुख सर ,शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष श्री नारायणराव शिंदे .
श्री नांदे सर आणि सहकारी यांनी मुले ज्ञानरचनावादी पद्धतीने कसे अध्ययन करतात याची पाहणी केली. मुलांना ही पद्धत कशी वाटते याविषयी विद्यार्थ्यांना विचारपूस केली . शिक्षकांना ज्ञानरचनावादी साहित्याची मांडणी आणि वापर कसा करतात याविषयी माहिती विचारली .शालेय परिसराची पाहणी केली . शालेय परिसर हिरवागार आढळल्याने सर्वांचे अभिनंदन केले . वर्गाखोल्यातील रंग सजावट आणि शैक्षणिक साहित्य बघून शिक्षकांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यावहीसाठी शुभेच्छा दिल्यात .
तुमच्या कार्याचे कौतुक करणारा अधिकारी वर्ग आणि त्यांची मायेची थाप तुमच्या पाठीवर पडली की आपोआप तुमच्या कार्याला गती प्राप्त होते . एक अद्भुत उत्साह आणि चैतन्याचे वातावरण आपल्या अवतीभोवती तयार होते आणि अधिक जोमाने नवीन कार्य करायला प्रेरणा मिळते असाच अनुभव आम्हाला कालच्या भेटीतून आला . आमची ही तळमळ अगदी शेवटपर्यंत अशीच चालू राहील . आपल्यासारखे अधिकारी लाभाल्याचा आनंद आम्हाला कार्य करण्यास सदैव प्रेरणा देत राहील ....
शब्दांकन : श्री अमोल खंगार मु.अ.प्रा.शा.बिबथर 9923838222





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा