![]() |
| श्री बालाजी जाधव यांचा सत्कार करताना गटशिक्षणाधिकारी श्री नांदे सर |
प्रमुख मार्गदर्शक श्री बालाजी बाबूराव जाधव ( जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवस्ती,केंद्र म्हसवड, तालुका माण जिल्हा सातारा ) यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन ' तंत्रज्ञानाचा शाळेत वापर कसा करावा ' या विषयी केले .या कार्यशाळेला तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
![]() |
| मार्गदर्शन करतांनी श्री जाधव सर |

मुलांच्या शिक्षणासाठी जाधव सरांची तळमळ आणि त्यांनी तंत्रज्ञानाच्या शालेय वापरासाठी केलेले प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे . संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्याचा त्यांचा मानस आहे . त्यांनी शालेय स्तरावर प्रशासन आणि अध्यापन या दोन्ही बाबींची प्रभावी अंमलबजावणी तंत्रज्ञानाच्या वापरणे अधिक सुकर आणि गतिशील कशी करता येते याचे प्रात्यक्षिकासह स्पष्टीकरण करून दाखविले.
जाधव सरांनी या कार्यशाळेत खालील महत्वाच्या आणि अतिशय उपयुक्त साधनांची माहिती आणि प्रात्यक्षिक सादर केले .
1) तंत्रज्ञान वापराची वैशिष्टे
2) google Input tool ( मराठी/ईतर भाषा टायपिंग on PC And Smartphone साठी )
3) विविध उपयुक्त google Applications
4) Email तयार करणे आणि वापरणे
5) Math Foundation आणि Math worksheet generator गणिताच्या अध्यापणासाठी
6) Emmas spelling games ईंग्रजीसाठी
7) voice typing (document आणि सादरीकरण तयार करण्यासाठी)
8) video conference ( एका शाळेतील शिक्षक अध्यापन करतांनी दुसर्या शाळेतील विद्यार्थी बघू शकतात )
9) Google Earth ( नकाशा /वास्तु /किल्ले /समुद्र satellite वरून बघण्यासाठी )
10) Stallerium अवकाश ज्ञान देणारे application 11) Epic Pen /Touch Board / microsoft Edge / infarred cameras /projector ही विविध उपकरणे
12) Text Fairy ( फोटो वरून स्कॅन करून Text )
13) Text to एमपी3 ( text converted to एमपी3 )
14) Windows movie maker ( व्हिडिओ तयार करण्यासाठी )
15) microsoft mouse mischeif
16) Yutube (ऑनलाइन व्हिडिओ पाहणे )
17) Handbreak ( व्हिडिओ विविध format मध्ये convert करणे साठी )
18) Yutube downloader (पीसी) /Tubemate (smathphone ) youtube व्हिडिओ Download करण्यासाठी
19) Screen Recording कशी करावी
20) online आणि offline test कशा तयार कराव्या आणि घ्याव्यात
अशा अनेक गोष्टी आणि उपकरणाची माहिती श्री जाधव सर यांनी कार्यशाळेत दिली
अशा कार्यशाळेचे आयोजन पंचायत समिति कळमनूरी यांनी पहिल्यांदा हिंगोली जिल्ह्यात केले ही कौतुकास्पद आणि अभिनंदनिय बाब आहे . या कार्यशाळेत अनेक शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले . वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील शिक्षकही या कार्यशाळेला उपस्थित होते.
आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोल खंगार यांनी आमच्या शाळेच्या blog ची माहिती कार्यशाळेत सांगितली. blog चे सादरीकरण थोडक्यात केले. श्री जाधव सर यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्यात
![]() |
| आमच्या शाळेच्या blog चे सादरीकरण करतांनी मु.अ.श्री अमोल खंगार |
पंचायत समितीतील जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमातील आमचे प्रमुख मार्गदर्शक श्री सोनुने सर आपले मनोगत व्यक्त करताना ...
मनोगत व्यक्त करताना आमच्या केंद्रातील तंत्रस्नेही शिक्षक श्री बालासाहेब चौरे ...
एकंदरीत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची आपल्या तालुक्याची वाटचाल यशाच्या दिशेने वेगाने होत असल्याचे आपल्या निदर्शनास येते आणि अशा कार्यशाळेच्या आयोजनामुळे या कार्यक्रमाला योग्य दिशा आणि गती प्राप्त होईल असे म्हणणे वावगे ठरणार नाही ..
पुन्हा एकदा शिक्षण विभाग पंचायत समिती कळमनूरी यांचे मनापासून आभार ...धन्यवाद !
तुमच्या तंत्रज्ञानविषयी काही समस्या असल्यास संपर्क करा
श्री बालाजी जाधव
मो.न.7588611015
www.balajijadhav.in
शब्दांकन : श्री अमोल खंगार मु.अ.प्रा.शा.बिबथर 09923838222






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा